अवाजवी बील आकारणी करणारे कोविड हॉस्पिटल्स रडारवर

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कारवाईचा इशारा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाबाधितांवर उपचार करणार्‍या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत.

त्यामुळे अवाजवी बिल आकरणी करणारे हॉस्पिटल्स प्रशासनाच्या रडावर असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिला आहे.

प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार केले जात आहे.

यातच काही रुग्णालये रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. याबाबत अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहे.

या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता सतर्क झाले असून शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक पैसे घेणार्‍या रुग्णांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

अनेक तक्रारी प्राप्त

कोरोनाबाधित रुग्णांकडून आकारले जाणार्‍या कच्च्या बिलाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिकांची लूट करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी अनेक नागरिकांकडून केली जात आहे.

याबाबतच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे केल्या आहेत. याची दखल घेतली जात असून लवकरच अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांनी सांगतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com