संतापजनक : बेडशीटमध्ये गुंडाळून दिला करोना बाधिताचा मृतदेह

साधना हॉस्पिटलमध्ये नियमांची ऐशी-तैशी; रुग्णालायाची चौकशी होणार
संतापजनक : बेडशीटमध्ये गुंडाळून दिला करोना बाधिताचा मृतदेह

अमोल कासार - जळगाव - Jalgaon :

करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

करोनबाधिताचा मृतदेहाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. घडलेला प्रकार गंभीर असून त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल.

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

परंतु शहरातील साधना हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी बाधिताचा मृतदेह प्लास्टीकच्या कव्हर पॅक न करता तो चक्क बेडशीटमध्ये गुंडाळून तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला.

जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील शेतकरी मार्तंंडराव रमेश देशमुख (वय 46) यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केटसमोरील साधना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

यावेळी डॉक्टरांनी त्यांना एचआरसीटीची टेस्ट करण्यास सांगितले त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले. त्यांचा स्कोअर अधिक असल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार करावे वलागणार असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.

पॅकींगची गरज नसल्याचे सांगून देवून टाकला मृतदेह

गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास देशमुख यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.

त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह नियमानुसार पॅकींग करुन देण्याबाबत मागणी केली असता, रुग्णालय प्रशासनाकडून ही सुविधा नसल्याचे सांगून पॅकींगची गरज नसल्याचे सांगून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करुन दिला.

खासगी रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूट केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शासनाने रुग्णालयांना दर निश्चित करुन दिले आहे.

परंतु रुग्णालयांकडून तरी देखील अव्वाच्या सव्वा वसूल केले जात आहे. साधना हॉस्पिटलमध्ये दरपत्रक रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले आहे. परंतू त्या दरपत्रकानुसार रुग्णांकडून आकारणीच केली जात नसल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे.

त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत ते तक्रार देखील करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर नेरीनाका स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतू खासगी रुग्णालयांकडून तूम्ही मृतदेह कुठेही घेवून जा काही होत असे असा अजब सल्ला रुग्णालयांकडून नातेवाईकांना दिला आहे.

मृतदेहाच्या नाकातोंडातून वाहत होते रक्त

नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्यांनी तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी थेट नेरीनाका स्मशानभूमीत दाखल केला. यावेळी नातेवाईकांनी अंत्यंसंस्कारासाठी मृतदेह उघडला असता मृतदेहाच्या नाका तोंडातून रक्त वाहत असल्याचे त्यांना दिसून आले.

अन् रुग्णालय प्रशासनाने बांधून दिला मृतदेह

मध्यरात्री 2 वाजता मार्तंडराव देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी वारंवार मागणी करुन देखील रुग्णालय प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात होता. यावेळी नातेवाईकांनी चार तास झाले तरी मृतदेह दिला नसल्याने नातेवाईकांनी विचारणा केली. यावर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह थेट रुग्णालयाच्या बेडशीटमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

रुग्णालयांकडून रुग्णांची हेळसांड

रुग्णालयात मृतदेह दाखल करीत असतांना रुग्णालयाकडून अनेक जाचक अटी रुग्णाच्या नातेवाईंकांना सांगितल्या जात आहे. परंतु नातेवाईक आपल्या रुग्णाला उपचार मिळावा यासाठी सर्व अटी मान्य करुन उपचारासाठी दाखल होत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक रुग्णालयांकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com