जिल्ह्यात आढळले आणखी 595 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
जळगाव

जिल्ह्यात आढळले आणखी 595 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 17 हजार 131

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह 595 रुग्ण आढळले.जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 17 हजार 131 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 144, जळगाव ग्रामीणमधील 21, भुसावळ येथील 7, अमळनेरातील 77, चोपडा येथील 25, पाचोरा येथील 27, भडगावातील 6,धरणगाव येथील 40, यावल येथील 6, एरंडोलमधील 65, जामनेरातील 35, रावेर येथील 7, पारोळा येथील 53, चाळीसगावातील 30, मुक्ताईनगरमधील 41, बोदवड येथील 2 व परजिल्ह्यातील 9रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 728 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 403 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 4 हजार 756 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 647 रुग्ण दगावले. यातील 9 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 1, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 5, मयत स्थितीत 1,1, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये , तर निलकमल हॉस्पीटल येथे एका रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भुसावळ तालुक्यातील 50 व 53 वर्षीय पुरूष ,जळगाव शहरातील 54व67 वर्षीय पुरूष,जळगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यातील 75 वर्षीय पुरूष, चोपडा तालुक्यातील 70 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 53 वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील 74 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे तपासणीसाठी येणार्‍या रुग्णांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने शासकीय यंत्रणेकडे तपासणीकरीता पाठवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी खाजगी सर्वसाधारण वैद्यकीय व्यावसायिकांना केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील अनेक रुग्ण हे खाजगी सर्वसाधारण व्यावसायिकांकडे जावून तपासणी करुन घेतलेले आढळून आले आहे. असे रुग्ण तपासणी करुन पुन्हा आपल्या कुटूंबात जातात. त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांच्यापासून कुटूंबातील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तातडीने शासकीय यंत्रणेकडे पाठवावे.

जिल्ह्यातील अनेक खाजगी व्यावसायिक सध्या असे रुग्ण पाठवित आहे. परंतु अजूनही काही व्यावसायिक रुग्णांना पाठवित नसल्याने संसर्ग वाढत असल्याचेही श्री. राऊत म्हणाले. आपल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा वाढताना जरी दिसत असला जरी आतापर्यंतच्या बाधित 16 हजार रुग्णांमध्ये ऍक्टिव्ह केसेस ह्या फक्त चार हजाराच्या आसपास आहेत. त्यातील साडेअकरा हजार लोकांना आपण डिस्चार्ज दिला असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेणार्‍या चार हजारपैकी दहा टक्के लोकांना ऑक्सिजन अथवा आयसीयुची आवश्यकता आहेत. इतर 90% म्हणजेच साडेतीन हजारांच्या अधिक रुग्ण हे सर्व चांगल्या स्थितीत आहेत. त्यांना कोणतीही अडचण नाही. ते कोविड केअर सेंटर अथवा होम क्वारंटाईन मध्ये आहेत. त्यामुळे रोज पेशंटची संख्या जरी वाढत असली आपल्याकडील जी फॅसिलिटी उपलब्ध आहे त्यावर याचा परिणाम होत नाही. आपल्याकडे मोठ्या प्रामणात बेड उपलब्ध आहे. याबाबतीत आपण स्वयंपूर्ण आहेत.असेही जिल्हाधीकार्‍यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com