चाळीसगाव : रस्त्यावर फिरणार्‍यांची जागेवरच कोविडची चाचणी

चाळीसगाव : रस्त्यावर फिरणार्‍यांची जागेवरच कोविडची चाचणी

पॉझिटिव्ह आढळल्यास तात्काळ करणार कोविड सेंटरमध्ये भरती

चाळीसगाव- chalisgaon - प्रतिनिधी :

करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ दिवसांची कडक संचारबंदी लागू केली असून या कालावधीत विनाकाराण बाहेर फिरणार्‍यांवर कठोर निर्बध लागू केले आहेत.

मात्र चाळीसगावात आज संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी संचारबंदीचे सर्व नियम धाब्यावर बसवत, रस्त्यांवर खुलेआम फिरत असल्याचे दिसून येत असल्याने चाळीसगाव पोलीस व आरोग्य विभागाने आशाची तात्काळ कोविडची रॅपीड टेस्ट घेण्यास सुरुवात केली असून यात पॉझिटिव्ह आढळल्यास लगेच कोविड सेन्टरमध्ये भरती केले जात आहे.

अचानक होत असलेल्या या चाचणीमुळे नागरिकांनी धावपळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना, विचार करुनच पडावे.

यासाठी शहरातील सिग्नल चौकासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह पोलीस आधिकारी, कर्मचारी व न.पा.चे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com