जिल्ह्यात 28 वर्षीय तरुणासह 18 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 28 वर्षीय तरुणासह 18 जणांचा मृत्यू

दिवसभरात 1 हजार 143 नवे बाधित तर 1 हजार 44 रुग्ण करोनामुक्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात करोनाचे 1हजार 143 नवे बाधित रुग्ण आढळून आले तर 1 हजार 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

तसेच पाचोरा तालुक्यातील 28 वर्षीय तरुणासह 18 जणंचा मृत्यू झाला असून मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपायोजना करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात आज 13 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 143 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 4 हजार 152 एवढी झाली आहे तर दुसरीकडे 1 हजार 44 करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 90 हजार 504 इतकी झाली आहे.

यात जळगाव शहर 296, जळगाव ग्रामीण 44, भुसावळ 99, अमळनेर 31, चोपडा 90, पाचोरा 43, भडगाव 4 धरणगाव 55, यावल 33, एरंडोल 12, जामनेर 58, रावेर 83, पारोळा 38, मुक्ताईनगर 197, बोदवड 53 आणि इतर जिल्ह्यातील 7 असे एकूण 1 हजार 143 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहर, जामनेर तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 18 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील 4, जामनेर तालुक्यातील 4, चाळीसगाव, जळगाव तालुका, रावेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर चोपडा, भुसावळ, पाचोरा व पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यह होणार्‍यांची संख्या ही 1 हजार 827 इतकी झाली असल्याने जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच आहे.

जिल्ह्यात 1 हजार 314 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 1 हजार 314 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com