विनाकारण फिरताहेत...तर रस्त्यावरच होणार ऍन्टीजन टेस्ट

जळगाव जिल्हयात पोलीस अधीक्षकांचा नवीन फतवा
विनाकारण फिरताहेत...तर रस्त्यावरच होणार ऍन्टीजन टेस्ट

जळगाव- Jalgaon :

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

याच पार्श्‍वभूमिवर रात्रीच्या संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्‍यांवर चाप बसावा, तसेच कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी पोलीस दलाकडून अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणार्‍यांची रस्त्यावर आहे त्याच जागी ऍन्टीजन टेस्ट करण्यात येणार असून चाचणीत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा निष्कर्ष आल्यास त्याठिकाणाहून रुग्णवाहिकेने कोव्हीड सेंटरवर दाखल करण्यात येणार आहे.

आज मंगळवार रात्रीपासून शहरासह सर्वत्र जिल्हयात ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर लागलीच एमआयडीसी पोलिसांकडून विनाकारण फिरतांन आढळून येणार्‍या चार ते पाच जणांची तपासणी करण्यात आली. ती तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरानाने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. विकेंड लॉकडाऊन, यासह लॉकडाऊन, कडक निर्बंध अशा अनेक उपाययोजनांची जिल्हा प्र्रशासनाकडून अंमबलजावणी केली जात आहे. प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र असे असतांनाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनोखा उपाय शोधला आहे.

संचारबंदीत शहरासह विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसोबत वैद्यकीय पथक राहणार आहे. विनाकारण फिरणारा आढळून आल्यास त्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाणार आहे.

करोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्याच जागेहून रुग्णवाहिकेतून त्याला कोव्हीड केअर सेंटर किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्रीपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र अशाचपध्दतीने कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.जिल्ह्यात कोरानाने एक लाखांचा टप्पा पार केला आहे.

विकेंड लॉकडाऊन, यासह लॉकडाऊन, कडक निर्बंध अशा अनेक उपाययोजनांची जिल्हा प्र्रशासनाकडून अंमबलजावणी केली जात आहे. प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र असे असतांनाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या संचारबंदीतही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनोखा उपाय शोधला आहे. संचारबंदीत शहरासह विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसोबत वैद्यकीय पथक राहणार आहे.

विनाकारण फिरणारा आढळून आल्यास त्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्याच जागेहून रुग्णवाहिकेतून त्याला कोव्हीड केअर सेंटर किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

मंगळवारी रात्रीपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र अशाचपध्दतीने कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com