जिल्ह्यात करोनाचे १२०१ नवे रुग्ण

१६ रुग्णांचा मृत्यू; ११९५ रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यात करोनाचे १२०१ नवे रुग्ण

जळगाव - Jalgaon :

शहरासह जिल्ह्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

सोमवारी १२०१ कोेरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १ लाख ३०९ इतकी झाली आहे.

दिवसभरात ११९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जळगाव शहर आणि अमळनेर तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी नव्याने १२०१ नवे कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर २१३, जळगाव ग्रामीण ३३, भुसावळ १२४, अमळनेर २२०, चोपडा १०४, पाचोरा ६९, भडगाव १५, धरणगाव ३६, यावल ६६, एरंडोल ८१, जामनेर ३३, रावेर १२२, पारोळा ०९, चाळीसगाव ०४, मुक्ताईनगर ५६, बोदवड ०९ तर अन्य जिल्ह्यातील ०७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी १६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, चोपडा तालुक्यात प्रत्येकी तीन, भुसावळ, चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी दोन, तर मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, यावल, रावेर तालुक्यांत प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

११ हजार ७४० रुग्णांवर उपचार

जिल्ह्यात दिवसभरात एकीकडे १२०१ नवे रुग्ण आढळून आले असून, दुसरीकडे ११९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ११ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत ८९ हजार ४६० रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३ हजार ०९ इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. यातील ८९ हजार ४६० रुग्णांनी कोरोनावर मात केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com