जळगाव जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून द्या

जळगाव जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून द्या

माजी महापौर भारती सोनवणे यांची केंद्रीय आरोग्य, रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

जळगाव - Jalgaon :

शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत.

रुग्णांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले रेल्वे कोविड आयसोलेशन कोच जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यावे,

अशी मागणी माजी महापौर, नगरसेविका भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, माजी महापौर भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद असून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com