जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. आज दिवसभरात 15 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून चिंताजनक बाब बनली आहे.

दिवसभरात 1194 नव्याने रुग्ण आढळले असून, 1224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.शहरासह जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ होत आहे.

आतापर्यंत 92 हजार 421 एवढी करोनाबाधित रुग्ण संख्या झाली असून, 79 हजार 180 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीला 11 हजार 573 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात 1194 नवीन रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर 232, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 36, चोपडा 200, पाचोरा 42, भडगाव 34, धरणगाव 90, यावल 22, एरंडोल 42, जामनेर 89, रावेर 13, पारोळा 17, चाळीसगाव 51, मुक्ताईनगर 73, बोदवड 08, तर अन्य जिल्ह्यातील 12 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1668 बाधितांचा मृत्यू

जिल्हाभरात शनिवारी 15 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 04, जामनेर 03, जळगाव तालुका, भुसावळ प्रत्येकी 02 तर चाळीसगाव, यावल, रावेर, धरणगाव तालुक्यात प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1668 इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.