जिल्ह्यात आढळले आणखी 753 पॉझिटिव्ह रुग्ण

Corona
Corona

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी करोना पॉझिटिव्ह 753 रुग्ण आढळले.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 29 हजार 686 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 115, जळगाव ग्रामीणमधील 19, भुसावळ येथील 50, अमळनेर येथील 87, चोपडा येथील 74, पाचोरा येथील 36, भडगावातील 42, धरणगावमधील 27, यावल येथील 38, एरंडोल येथील 9, जामनेरातील 38, रावेर येथील 14, पारोळा येेथील 96, चाळीसगाव येथील 58, मुक्ताईनगरातील 27, बोदवड येथील 18 आणि परजिल्ह्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 513 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 7 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 840 रुग्ण दगावले. यातील 9 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 1, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 2, जामनेर येथे 1, भडगावात 2, अमळनेर येथे 1, रुबी हॉस्पिटलमध्ये 1, ओम क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 57 व 65 वर्षीय पुरुष, तर 64 वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यामधील 70 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com