जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून चिंताजनक बाब मानली जात आहे.

सलग तिसर्या दिवशी 14 बाधितांचा मृत्यू झाला असून दिवसभरात 1 हजार 194 बाधित रुग्ण नव्याने आढळले आहे. दरम्यान जळगाव शहरात 284 तर चोपडा तालुक्यात 293 बाधितांचा समावेश आहे

जिल्ह्यात आज 28 मार्च रोजी दिवसभरात 1 हजार 194 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 85 हजार 483 एवढी झाली आहे तर दुसरीकडे 967 करोनामुक्त झाले आहेत.

यात जळगाव शहर 284, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 106, अमळनेर 27, चोपडा 293, पाचोरा 33, भडगाव 110,धरणगाव 64, यावल 47, एरंडोल 25, जामनेर 25, रावेर 10,पारोळा 31, चाळीसगाव 74, मुक्ताईनगर 11, बोदवड 15 आणि इतर जिल्ह्यातील 19 असे एकूण 1 हजार 194 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू

रविवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 14 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चोपडा तालुक्यातील 4, जळगाव शहरातील 3 तर यावल, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन तर भुसावळ, अमळनेर व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 1 हजार 583 इतका झाला आहे.

अॅक्टीव्ह रुग्णांनी पार केला 11 हजाराचा टप्पा

जिल्ह्यात आज दिवसभरात 967 जणांची कोरोनावर मात केली असून आतापर्यंत करोनामुक्त होणार्यांची संख्या ही 72 हजार 745 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत 11 हजार 155 अॅक्टीव्ह रुग्ण असून अॅक्टीव्ह रुग्णांनी 11 हजारांचा टप्पा पार केला आहे.