जिल्ह्यात आढळले आणखी 696 पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण रुग्ण संख्या 27 हजार 135
जिल्ह्यात आढळले आणखी 696 पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह 696 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 27 हजार 135 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 169, जळगाव ग्रामीणमधील 59, भुसावळ येथील 26, अमळनेरातील 142, चोपडा येथील 78, पाचोरा येथील 12, भडगावातील 12, धरणगावातील 23, यावल येथील 11, एरंडोलमधील 5, जामनेरातील 34, रावेर येथील 27, पारोळ्यातील 59, चाळीसगाव येथील 27, मुक्ताईनगरातील 8, बोदवड येथील 3, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 213 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 515 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 7 हजार 116 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 806 रुग्ण दगावले. यातील 8 रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 3, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 2, भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये 1, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये 1, चाळीसगाव येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 79 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील 67 वर्षीय महिला, पाचोरा तालुक्यामधील 60 वर्षीय महिला, भडगाव तालुक्यातील 73 वर्षीय महिला, चोपडा तालुक्यामधील 65 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यामधील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com