जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 1 फेब्रुवारी रोजी नव्याने 47 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 81 एवढी झाली आहे.

आज दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर 1 हजार 64 आरोग्य कर्मचार्यांनी लस टोचून घेतली.

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, भडगाव, धरणगाव, जामनेर, पारोळा, बोदवड या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 379 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 358 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 22, भुसावळ 1, अमळनेर 3, चोपडा 2, पाचोरा 1, यावल 1, एरंडोल 1, रावेर 3, चाळीसगाव 8, मुक्ताईनगर 4 तर इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 47 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 1 हजार 64 जणांनी घेतली लस

जिल्ह्यातील पंधरा केंद्रावर आज लसीकरणाची मोहिम पार पडली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 97, जामनेर 62, चोपडा 76, मुक्ताईनगर 58, चाळीसगाव 68, भुसावळ 51, अमळनेर 71, पाचोरा 50, रावेर 86, यावल 80, डी. बी. जैन रुग्णालय जळगाव 106, गोल्डसिटी जळगाव 108, भडगाव 87 तर बोदवड 64 असे एकूण 1 हजार 64 जणांनी लस टोचून घेतली. आतापर्यंत 6 हजार 619 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचे शल्यचिकीत्सकांनी सांगितले.

सर्वात कमी पारोळा केंद्रावर होतेय लसीकरण

पारोळा येथे लसीकरणासाठी केंद्र तयार करण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवसापासून याठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात लसीकरण केले जात आहे. आज या केंद्रावर एकही कर्मचार्याने लस टोचून घेतली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच आतापर्यंत या केंद्रावर केवळ 384 कर्मचार्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचे दिसून येत आहे.