आणखी करोना पॉझिटिव्ह ७८० रुग्ण

आणखी करोना पॉझिटिव्ह ७८० रुग्ण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी करोना पॉझिटिव्ह ७८० रुग्ण आढळले.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २५ हजार ८७३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २१५ रुग्ण, जळगाव ग्रामीणमधील ४२, भुसावळ येथील २२, अमळनेरातील ६२, चोपडा येथील ८३, पाचोरा येथील २६, भडगावातील ३३, धरणगावातील ३८, यावल येथील २१, एरंडोल येथे ०८, जामनेरातील ४२, रावेर येथील २९, पारोळ्यातील ६९, चाळीसगाव येथील ७९, मुक्ताईनगरातील ०१, बोदवड येथील ०९, परजिल्ह्यामधील ०१ रुग्णांचा समावेश आहे

जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ५६३ रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ६ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ७८९ रुग्ण दगावले. यातील ११ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात १, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ०५, आरुश्री हॉस्पिटल १, चोपडा येथे १, भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात २, समर्थ हॉस्पिटल चाळीसगावमध्ये १ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जळगाव शहरातील ५८ व ६१ वर्षीय पुरुष,

जळगाव तालुक्यामधील ६१ वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यातील ५७, ७६ वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यामधील ३०, ८५ वर्षीय पुरुष, भडगाव तालुक्यातील ५८, ७३ वर्षीय पुरुष, चोपडा तालुक्यातील ७४ वर्षीय पुरुष व अमळनेर तालुक्यातील ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com