जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 21 जानेवारी रोजी नव्याने 37 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण करोना बाधितांची संख्या 56 हजार 765 एवढी झाली आहे.

आज दिवसभरात 2 बाधिताचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे 47 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, पारोळा, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यामध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 938 जणांनी कोरोनावर मात केली आहे.तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 351 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 16, भुसावळ 4, चोपडा 2 , भडगाव 1, यावल 2, एरंडोल 1, जामनेर 2, रावेर 4, चाळीसगाव 5 असे एकूण 37 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवभरात दोन बाधितांचा मृत्यू झालेला आहे.

यात जळगाव शहर व मुक्ताईनगर तालुका येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.