जिल्ह्यात नव्याने 56 करोनाबाधित आढळले

जळगाव शहरात सर्वाधिक 40 रुग्ण
जिल्ह्यात नव्याने 56 करोनाबाधित आढळले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज मंगळवार 12 जानेवारी रोजी 56 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यत एकूण करोना बाधितांची संख्या 56 हजार 431 पर्यत पोहचली आहे.

दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सर्वाधिक 40 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत.

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड या आठ तालुक्यामध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 593 जणांनी करोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 339 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 40, भुसावळ 1, अमळनेर 1, चोपडा 3, पाचोरा 2, रावेर 2, पारोळा 4, चाळीसगाव 2 तर इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 56 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

मंगळवारी दिवभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com