जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी करोनाचे 42 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण करोनाबाधितांची संख्या 56 हजार 225 एवढी झाली आहे.

दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे 40 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.अमळनेर, चोपडा, भडगांव, धरणगांव, एरंडोल, रावेर, पारोळा, चाळीसगांव, आणि बोदवड अशा 9 तालुक्यांसह इतर जिल्हयातील एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 396 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 336 एवढ्या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 29,भुसावळ 3, पाचोरा 2, यावल 2, जामनेर 2, मुक्ताईनगर 1, असे एकूण 42 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी दिवभरात भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय व चोपडा तालुक्यातील एक अशा दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.