जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी बरे होणार्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. डिसेंबर महिन्यात 1294 बाधित झाले होते तर 1353 रुग्ण हे बरे झाले आहे.

तसेच महिनाभरात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात जिल्ह्यात 29 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून 44 जण करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या बाधितांपेक्षा बरे होणार्यांची संख्या अधिक दिसून येत आहे.

विदेशात करोनाचा नवा स्टे्रंथ आल्यामुळे अनेक देशांकडून उपाय योजना सुरु झाल्या आहे. यातच दिवसेंदिवस बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

आज दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 29 नवे रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 950 इतका झाला असून 44 जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याने आतापर्यंत 54 हजार 177 जण कोरोनामुक्त झाले आहे.

तसेच आज एकही जणाचा मृत्यू झाला नसून झाल्याने मृतांची संख्या ही 1 हजार 329 इतका झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात आतापर्यंत 444 इतके रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 9, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 1, चोपडा 7, पाचोरा 3, यावल 4, पारोळा 2, चाळीसगाव 1 असे एकूण 29 रुग्ण आढळून आले.