जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला असून

आज दिवसभरात करोनाचे 60 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असल्याने कोरोनाचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला होता. परंतु गुरुवारी कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 60 नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढलेली आहे.

तसेच जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 855 इतका झाला असून 44 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याने आतापर्यंत 54 हजार 78 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आज एका जणाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही 1 हजार 329 इतका झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 10, भुसावळ 8, अमळनेर 3, चोपडा 17, पाचोरा 6, यावल 1, जामनेर 4, रावेर 2, मुक्ताईनगर 8 यासह इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 60 रुग्ण आढळून आले आहे.