जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात करोनाचे 38 नवे रुग्ण आढळून आले.

50 जण करोनामुक्त झाले असल्याने बाधितांपेक्षा बरे होणार्यांची सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. तसेच आज पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 715 इतका झाला असून 50 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

त्यामुळे बरे होणार्यांची संख्या ही 53 हजार 998 इतकी झाली असून त्यांना जणांना घरी पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज जळगाव शहरातील दोन जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मयत झाललेल्यांची संख्या ही 1 हजार 325 इतकी आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 15, जळगाव ग्रामीण 4, भुसावळ 3, अमळनेर 3, चोपडा 2, पाचोरा 1, भडगाव 2, धरणगाव 1, जामनेर 1, पारोळा 1, चाळीसगाव 3, बोदवड 2 असे एकूण 38 नवे रुग्ण आढळून आले आहे.