जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा करोनाचा कहर सुरु झाला आहे.

आज दिवसभरात करोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले आहे. तसेच शनिवारी 33 बाधित कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला होता. परंतु काही दिवसांपासून कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झत्तले होते.

मात्र आज दिवसभरात करोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 621 इतका झाला असून 33 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याने आतापर्यंत 53 हजार 884 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत मयतांची संख्या ही 1 हजार 319 इतकी आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 8, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 4, अमळनेर 2, चोपडा 3, धरगणाव 1, यावल 2, पारोळा 3 असे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहे.