जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात नव्याने आढळून येणार्या करोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

करोनाने आज 50 चा आकडा पार केला असून जिल्ह्यात नव्याने 71 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

एकूण करोनाबाधितांची संख्या 55 हजार 562 एवढी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 23 हे जळगाव शहरात आढळून आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नव्याने आढळून येणार्या करोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे.

गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 71 नवे रुग्ण आढळून आले आहे. तसेच 37 जण कोरोनामुक्त झाले असून दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु गुरुवारी कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 53 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 319 एवढ्या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 23, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 11, अमळनेर 7, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 1, यावल 5, एरंडोल 1 जामनेर 2, रावेर 5, पारोळा 2, चाळीसगाव 7 असे एकूण 71 रुग्ण आढळून आले आहेत.