जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला असून आज दिवसभरात कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळून आले आहे.

त्यामुळे करोनाची पुन्हा पन्नाशीपार केल्याने जिल्हावासीयांच्या चितेंत भर पडली आहे. तसेच मंगळवारी 31 जण कोरोनामुक्त झाले असून एकाही जणाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला होता. परंतु मंगळवारी कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.