जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा करोनाचा कहर सुरु झाला असून आज दिवसभरात करोनाचे 46 नवे रुग्ण आढळून आले आहे.

त्यामुळे करोनाची पुन्हा पन्नाशीकडे वाटचाल सुरु झाली आहे. तसेच सोमवारी 36 जणांना डिस्चार्ज दिला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला होता. परंतु सोमवारी कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी दिवसभरात जिल्हाभरात करोनाचे 46 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 401 इतका झाला असून 36 जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली.

आतापर्यंत 53 हजार 721 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आज दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही 1 हजार 319 इतका झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जिल्ह्यातील जळगाव शहर 21, भुसावळ 6, चोपडा 5, पाचोरा 2, पारोळा 3, रावेर 2 यासह धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.