जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा नव्याने 33 रुग्ण आढळुन आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 55 हजार 286 इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 05, जळगाव ग्रामीणमधील 02, भुसावळ येथील 03, अमळनेरातील 01 , चोपडा येथील 01, चाळीसगावमधील 11 , मुक्ताईनगरातील 10, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 00 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 53 हजार 612 रुग्ण करोनामुक्त झाले. यातील 46 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 357 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.