जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाच्या प्रसाराची भीती

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाच्या प्रसाराची भीती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड रुग्णांसाठी ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी जुन्या आयसीयू वार्डात करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.

याच ठिकाणी इतर गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. वार्डात दाखल असलेल्या रुग्णाचे नातेवाईक बिनधास्तपणे याठिकाणी वावरत असल्याने रुग्णालयात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा नॉन कोविड रुग्णांसाठी ओपीडी सुरु केल्याने नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

दरम्यान याच रुग्णालयातील सुमारे 175 बेड हे कोविडच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याठिकाणावरील जून्या आयसीयू वार्डात कोविडचे 9 रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरीत बेडवर इतर गंभीर आजारामुळे अत्यावस्थ असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु अल्याची चित्र आयसीयूच्या वार्डात दिसून आले.

कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी वेगळे वार्ड राखीव ठेवण्यात आले आहे. परंतु जून्या आयसीयूच्या वार्डात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुुरू असून याच ठिकाणी इतर गंभीर आजारांचे रुग्ण दाखल आहे. तसेच या रुग्णांचे नातेवाईकांचा याठिकाणी सर्रास वावर असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रुग्णांना बेड मिळेना

जिल्ह्यासह शहरातील स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. परंतु एकीकडे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.

मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून हे सेंटर बंद केले जात असल्याने जिल्हाभरातील कोरोना संशयीत किंवा पॉझिटिव्ह रुग्ण थेट शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल होत असल्याने याठिकाणावरील बेड गंभीर रुग्णांसाठी शिल्लक नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात ताळकटत बसावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com