जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्याच दिवशी ओपीडी फुल्ल

जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्याच दिवशी ओपीडी फुल्ल

320 रुग्णांपैकी 32 रुग्ण उपचरार्थ दाखल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित उपचारांसाठी (नॉन कोविड) 22 जुलै पासून खुले झाले. गेली 4 महिन्यांपासून हे रुग्णालय केवळ करोनाबाधित रुग्णांसाठी खुले होते.

करोना सोडून इतर आजारांवर उपचार करण्यासाठी सामान्य नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांना 21 विविध विभागाद्वारे वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोनाविरहित सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार झाले आहे. पहिल्याच दिवशी रुग्णांची गर्दी होती. नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करून नॉन कोविड रुग्णसेवेचा लाभ घ्यावा

डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय

पहिल्या दिवशी 320 जणांनी मनॉन कोविड म सुविधेचा लाभ घेतला. तर 32 जण विविध वॉर्डात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 22 जुलै 2021 पासून रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोरोनाविरहित उपचारासाठी सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. तर कोरोना महामारीच्या रुग्णांना मोहाडी येथील स्त्री रुग्णालयात उपचार होतील.

त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 22 जुलै रोजी कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु झाली. सकाळी 9 वाजता रुग्ण महिलेस केसपेपर देऊन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय सुविधेला प्रारंभ केला.

ओपीडीमध्ये नेत्रतपासणी, ईसीजी, मानसोपचार, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, फिजिओथेरपी, कान-नाक-घसा, छातीरोग, रक्ततपासणी, स्त्रीरोग, प्रसुतीपूर्व तपासणी, कुटुंब नियोजन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग या विभागात तपासणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याशिवाय फिजिशियन सेवा व प्राणी चावल्यावर द्यावयाचे इंजेक्शन, प्लास्टर व ड्रेसिंग करण्यासाठी, एक्स रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन करण्यासाठी देखील नागरिक आले होते.

नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवारात असणार्‍या जनसंपर्क कक्षाची मदत होत होती. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व रुग्णालयाच्या आवारात आणि ओपीडीच्या सर्व विभागात, वॉर्डात पाहणी करून डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना केल्या. यासह त्यांना मार्गदर्शन केले. रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणखी काय करता येईल यासाठी चर्चा केली.

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आजारावर इलाज घेण्यासाठी येताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड आणावे. नागरिकांना मदतीसाठी जनसंपर्क कक्ष सुरु राहणार आहे. वाहन पार्किंगकरीता गेट क्र. 2 चा वापर करावा व रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com