जिल्हा रुग्णालयात ’ऑपरेशन ऑक्सिजन’ यशस्वी

ऑक्सिजनचे दुसरेही टँकर दाखल; 16 मेट्रिक टन उपलब्ध
जिल्हा रुग्णालयात ’ऑपरेशन ऑक्सिजन’ यशस्वी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन पूर्णपणे संपले होते.त्यामुळे पर्यायी व्यवस्था करुन ऑपरेशन ऑक्सिजन मोहीम यशस्वी केल्यामुळे पुढील अनर्थ ठळला.

जिल्हा रुग्णालयात ’ऑपरेशन ऑक्सिजन’ यशस्वी
‘सिव्हिल’ ऑक्सिजनवर

त्यानंतर रात्री 12.45 वाजता 5.5 मेट्रिक टन ऑक्सिजनचा टँकर आला.तर शुक्रवारी दुपारी 15.5 आणि मेट्रिक टन ऑक्सिजन भरला गेला.त्यामुळे आता जवळपास 16 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

गुरुवारी 13 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 20 किलो लिटरचे ऑक्सिजन टँक संध्याकाळी 7. 30 वाजता पूर्णपणे संपले. मात्र हिम्मत न हरता ऑक्सिजन टँक संपण्याच्या 10 मिनिट आधी डॉ. संदीप पटेल यांनी तातडीने 100 ऑक्सिजन सिलेंडरची बॅकअप प्रणाली सुरु केली. ज्यांची ड्युटी संपली आहे, त्या कर्मचार्‍यांनाही तातडीने बोलावून ऑपरेशन ऑक्सिजन सुरु केले.

सर्व वॉर्डात जाऊन त्यांनी आढावा घेतला. मक्तेदाराला संपर्क करीत नव्याने 100 सिलेंडर आणखी मागवून घेतले. ऑक्सिजन टँकर मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ऑक्सिजन टँकर आले त्यावेळी त्यांनी टँकर पूर्ण उतरवून घेतला, त्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तब्बल आठ तास ऑक्सिजन समितीची धावपळ सुरु होती. यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद हेदेखील तब्बल 6 तास थांबून डॉ. पटेल यांचे व्यवस्थापन पाहत वेळ पडल्यास त्यांना मार्गदर्शन करीत होते. ऑक्सिजन प्रणाली सुरळीत करण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते.त्यामुळे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. संदीप पटेल यांचा पुष्प देऊन सत्कार केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com