जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

दुचाकीने धडक दिल्याने त्यात शिरसाली प्र.न.येथील भगवान वसंत न्हावी (वय ४५) हे ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता जळके रस्त्यावर घडली.

अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. भगवान हा बांधकाम कारागीर होता.भगवान न्हावी हे सात वाजता गांवातुन जळके रस्त्यावरील भोलेनाथ नगर येथील अपल्या घरी पायी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. भगवान च्या पश्यात पत्नी,दोन मुले ,आई व दोन भाऊ आहेत. भगवान हा भैय्या न्हावी यांचा मोठा भाऊ होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.