अंत्यविधी आटोपून गावाकडे परतणार्‍या तरुणाचा अपघातात मृत्यू

मालवाहू वाहनाने दुचाकीला उडविल्याने जागीच ठार ; शिरसोलीजवळ आकाशवाणी केंद्रासमोरील घटना
अंत्यविधी आटोपून गावाकडे परतणार्‍या तरुणाचा अपघातात मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पंढरपूर नगरात अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा गावाकडे परततांना दुचाकीला चारचाकीने उडविल्याने यात दुचाकीस्वार संतोष रमेश पाटील वय 34 रा. गोंडगाव ता. भडगाव हा जागीच ठार झाल्याची घटना शिरसोली येथील आकाशवाणी केंद्रासमोर घडली.

अपघातानंतर पसार होणार्‍या चालकासह मालवाहू वाहनाला ग्रामस्थांनी पाठलाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

शहरातील खेडी परिसरातील पंढरपूर नगरातील मंजुळाबाई मन्साराम पाटील वय 85 यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गोंडगाव येथील नातेवाईक शनिवारी चारचाकीने जळगावात आले होते.

तर संतोष रमेश पाटील हा दुचाकीला आला होता. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यावर नातेवाईक पुन्हा चारचाकीने परत गावाकडे निघाले. यावेळी संतोष याने मी सारी सरकावयाचा कार्यक्रम आटोपून येतो असे सांगितले.

नातेवाईक मार्गस्थ झाल्यानंतर थोड्या वेळाने संतोष हा त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.19 बी.ए.5423 ने गोंडगावला जाण्यासाठी निघाले. यादरम्यान शिरसोलीजवळील आकाशवाणी केंद्रासमोर समोरुन येणार्‍या मालवाहू वाहन क्रमांक एम.एच. 04 ई वाय 4172 ने संतोष याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दुचाकीस्वार संतोष रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या रक्तश्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्या ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. फरार होत असलेल्या मालवाहू चालकास वाहनास गावातून पकडले. तसेच एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, शुध्दोधन ढवळे यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

मयत संतोष पाटील हे खाजगी वाहनावर चालक होते. त्यांच्या पश्चात वडील रमेश वामन पाटील, आई सरस्वताबाई, पत्नी रत्ना व दोन मुले युवराज व प्रशांत असा परिवार आहे. वडील शेती करतात.

घटनेची माहिती मिळाल्यावर चारचाकीने गावाकडे निघालेले नातेवाईक अर्ध्या रस्त्यातून पुन्हा जळगावकडे परतते. जिल्हा रुग्णालयात गाठले. याठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com