महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले, एक जण ठार

बांभोरी जवळील जैन इरिगेशन कंपनीसमोर अपघात : तरुण जखमी
महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले, एक जण ठार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरालगत बांभोरी नजीक जैन इरिगेशन कंपनीसमोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील कडू बुधा धनगर 9वय 55,रा.पाळधी, ता.धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक ईश्वर कुंभार (वय 28,रा.पाळधी, ता.धरणगाव) हा तरुण जखमी झाला. सकाळी पावणे अकरा वाजता हा अपघात झाला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कडू धनगर हे पाळधी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. ते ट्रक चालक म्हणून खासगी नोकरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवितात. त्याचा मुलगा देखील वाहन चालक आहे.

कडू धनगर हे ज्या ट्रकवर चालक म्हणून नोकरीला आहेत, तो ट्रक नादुरस्त झाल्याने त्याचे स्पेअरपार्ट घेण्यासाठी बुधवारी ते पाळधी येथून दीपक कुंभार याला घेऊन दुचाकीने जळगावला येत होते.

जैन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला मागून व पुढे गंभीर दुखापत झाल्याने धनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक याचा हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

धनगर यांना मृत घोषीत करण्यात आले तर दीपक याला प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. धडक देणारे वाहन जागेवर न थांबता चालक वाहनासह पसार झाला. धनगर यांच्या पश्चात पत्नी संगीता व मुलगा सुखदेव असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com