...अखेर 'त्या' कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

नशिराबाद येथील घटना : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने घडली होती घटना
...अखेर 'त्या' कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील नशिराबाद येथे बालाजी तोलकाट्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकावर बसलेल्या दोन जणांना भरधाव कारने उडविल्याची घटना 11 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती.

या अपघातात झैनोद्दीन अमिर मण्यार वय 60 रा. मणीयार मोहल्ला, नशीराबाद याचा मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी सोमवार, 12 जुलै रोजी अज्ञात कारचालकाविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

11 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास नशीराबाद येथील बालाजी तोलकाट्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर वाहन उभे करुन झैनोद्दीन मण्यार व चांदखान रशीदखान हे दोघे जण बसले होते. यादरम्यान भुसावळकडून एम.एच. 19 झेड 2020 या क्रमांकाची भरधाव वेगाने कार आली.

त्याने अचानक बे्रक दाबला, यात त्याचा कारवरील ताबा सुटला. या कारने दुभाजकावर बसलेल्या झैनोद्दीन व चांदखान मण्यार या दोघांना धडक दिली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. झैन्नोदीन मण्यार यांचा यात मृत्यू झाला होता.

तसेच वाहनाचेही नुकसान झाले होते. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. या अपघाताप्रकरणी सोमवार 12 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शरीफ खान, शशीद खान वय 44 रा. रहेमान शहा बाबा चौक, नशीराबाद यांच्या फिर्यादीवरुन एम.एच. 19 झेड 2020 या क्रमाकांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र भास्कर करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com