मुंबईच्या दोघा मित्रांचा नशीराबादजवळ अपघातात मृत्यू

मुंबईच्या दोघा मित्रांचा नशीराबादजवळ अपघातात मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

साकेगाव येथे होणार्‍या पत्नीसह सासूला साकेगाव येथे सोडून पुन्हा मुंबईकडे परतणार्‍या ठाणे जिल्ह्यातील अभीजित सुभाष पसारे (वय 30, रा.डोंबिवली) व पवन नंदू बागुल (वय 28,रा.मानपाडा) या दोघाचा मित्रांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भुसावळ, जळगाव रस्त्यावरील सरस्वती फोर्डजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने तब्बल 10 ते 15 वेळा पलटी होवून हा अपघात

अपघातातील दोघं तरुण अनोळखी होते, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. पवनच्या खिशात औषधींचे बील होते तर अभिजीतच्या खिशात आधार व पॅनकार्ड होते. घटना घडल्यानंतर साकेगावचेही काही नागरिक घटनास्थळी आले होते.

अभिजीत याचे मामा चंद्रकांत पांडूरंग जोशी हे खेडी येथील रहिवाशी असल्याने नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला तर पवनचेही नातेवाईक खडकदेवळा, ता.पाचोरा येथे आहेत. दोघांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गाठल्यावर त्यांनी ओळख पटली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com