महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर

कंटेनरला गळती अन् डिझेल नेण्यासाठी नागरिकांची गर्दी

जळगाव - Jalgaon :

शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ डिझेल घेऊन जाणार्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची आज शुक्रवारी घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी नागरिक अपघातग्रस्त कंटेनरमधील डिझेल नेण्यामध्ये व्यस्त असल्याची शोकांतिका या वेळी पाहायला मिळाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास खोटेनगरजवळ डिझेल वाहून नेणाऱ्या कंटेनरने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली.

दरम्यान या अपघातात कंटेनरला गळती लागली. आपल्या कंटेनरमधून डिझेलची गळती होत असल्याचे प्रकार लक्षात आल्यानंतर चालकाने महामार्गालगत कंटेनर बाजूला लावला. व चालक पसार झाला चालक पसार झाल्यानंतर गळती होत असलेल्या कंटेनरमधून डिझेल वाहून नेण्यासाठी मिळेल ते भांडे घेऊन नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

दरम्यान या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र नेमक्या जखमीचे नाव हे कळू शकलेले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com