भरधाव कार डंपरवर धडकली, कारचालक तरुण जागीच ठार

साकेगावजवळ अपघात : दोन जण जखमी
भरधाव कार डंपरवर धडकली, कारचालक तरुण जागीच ठार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राष्ट्रीय महामार्गावर साकेगावजळव महामार्ग प्राधीकरणाच्या कामावरील डंपरवर भरधाव कार धडकल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या अपघातात कारमधील सागर सावळे (वय 23) रा. शामनगर, गेंदालाल मिल, जळगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच्या सोबतचे मयूर

काळे (वय 21) अंकुश सुरवाडे (वय 22) दोन्ही रा. शामनगर, गेंदालाल मिल जळगाव हे दोन्ही तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

आयुष प्रोकॉनच्या कंपनीने जळगाव भुसावळ या महामार्गाच्या कामाचा कंत्राट घेतला आहे. या कामानिमित्ताने साकेगावजवळ महामार्गालगत कंपनीचे वाहने तसेच कर्मचार्‍यांसाठी सुविधा करण्यात आली आहे.

या ठिकाणाहून आज सोमवारी दुपारी अचानकपणे एमएच-19-सि वाय-2280 या क्रमांकांचा डंपर महामार्गावर आला. या डंपरचा भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या क्रमांक एमएच-18- डब्ल्यू -5783 या वरील कार चालकाला अंदाज आला नाही.

डंपर दिसताच कारचालकाने जोराने ब्रेक दाबून कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यात तब्बल 20 फुटापर्यत कार घसरत जावून शेवटी डंपरवर धडकली. यात कारमधील सागर जावळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याच्यासोबतचे मयूर काळे, अंकुश सुरवाडे हे दोघे जखमी झाले. दोघांना उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच साकेगावसह परिसरातून आयुष प्रोकॉनच्या कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com