कारच्या जोरदार धडकेत फुटबॉल सारखा उडाला तरुण

जिल्हा क्रीडा संकुलासमोर झाला अपघात
कारच्या जोरदार धडकेत फुटबॉल सारखा उडाला तरुण

जळगाव - Jalgaon :

शहरातील प्रतापनगरातील मुख्य स्टेट बँकेसमोरुन जाणार्या रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी रात्री नऊ नऊ वाजेच्या सुमारास घडली.

कारची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार तरुण फुटबॉलसारखा हवेत उडाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पंकज खरे असे जखमी तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली असुन त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार असे के पंकज खरे हा त्यांचा जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात राहणारे मित्राची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.सी.१५०) घेऊन जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकाला पाहण्यासाठी गेला होता.

जिल्हा रुग्णालयातून परतत असताना स्टेट बँकेसमोर नवीन बसस्थानकाकडे जाणार्‍या चारचाकीने (क्र. एम.एच.१९ सी.वाय.९९३९) दुचाकीला जोरदार धडक दिली.

पाच ते दहा फूट दुचाकींसह तरुणाला कारने फरफटत नेले. व न थांबता वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी गंभीर जखमी झालेल्या या तरूणास जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून कारचाही समोरील बोनेटसह नंबरप्लेट निखळून पडली हाेती.

कारच्या मिळून आलेल्या नंबरवरून जिल्हापेठ पाेलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे माहिती घेतली असता कार वासुदेव महाजन नामक व्यक्तीची असल्याचे कळते. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पाेलिसांची कारवाई सुरू होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com