चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरु असताना, शहरातील दोन हॉटेवर अवैद्यरित्या दारु विक्री सुरु ठेवणे चांगलेच महागात पडले. चाळीसगाव येथील पाटणदेवी रोडवर असलेल्या हॉटले पाटर्णाइवर छापा टाकुन पोलिसांनी अवैद्यरित्या साठवणूक केलेला ६ हजार ८४० रुपयांचा दारु साठ जप्त केला आहे. तर औरंगाबाद-धुळे बायपास वरील हॉटेल शिवण्या हि देखील लॉकडाऊनमध्ये चालू होती. या ठिकाणी देखील पोलिसांनी छापा मारुन २ हजार ८९० रुपयांचा बिअरचा मध्य साठा जप्त केला. हि कारवाई दि,२९ रोजी करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलचालकावर गुन्हां दाखल करण्यात आला.

कोविडला आला घालण्यासाठी प्रतिबांधात्मक उपाययोजना चालू आहेत. यात कलम १४४ प्रमाणे विशेष निर्बध जाहिर करण्यात आले असून सर्व हॉटल व रेस्टौरंट बंद ठेवण्याचे आदेश आहे. जिल्ह्यासह तालुक्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन चालू आहे. यात सपोनि.एन.ए.सैय्यद, संदिप भोई, होमगार्ड मदन गोसावी, होम.चंदकांत खैरनार आदि पेट्रोलिंग करीत असताना, त्याना पाटणादेवी रोडवरील हॉटेल पाटणाई चालू असून त्यात अवैद्यरित्या दारु साठ असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने तात्काल छापा टाकला. पोलिसांनी हॉटेलची तपासणी केली असता, त्या ठिकाणी बैकादेशिरयरित्या ६ हजार ८४० रुपयेे किमंतीचा देशी, विदेशी कंपनीची दारु मिळुन आली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनला पोकॉ.अमोल भरत पाटील यांच्या फिर्यादीवरुन अशोक झिनकन वर्मा (२५) रा.टाकळी. प्र.चा, अमोल अण्णा उसरे(२३) रा. टाकळी प्र.चा., यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. तर दुसर्या कारवाईत औरंगाबाद-धुळे बायपास वरील हॉटेल शिवण्या हि देखील लॉकडाऊनमध्ये चालू होती. या ठिकाणी देखील पोलिसांनी छापा मारुन २ हजार ८९० रुपयांचा बिअरचा मध्य साठा जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला श्रीकांत अशोक महाले, रा.जुने विमानतळ, संदिप तुकाराम लोणारी रा.नगावबारी, धुळे, यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.