बहुप्रतिक्षेनंतर बुधवारी रात्री जळगाव शहरात धो-धो पाऊस बरसला.
बहुप्रतिक्षेनंतर बुधवारी रात्री जळगाव शहरात धो-धो पाऊस बरसला.
जळगाव

जळगाव : शहरात बरसला धो-धो पाऊस

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

बहुप्रतिक्षेनंतर बुधवारी रात्री जळगाव शहरात धो-धो पाऊस बरसला. तब्बल पाऊण तास चाललेल्या पावसामुळे संपूर्ण जळगाव शहरच जलमय झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव शहराला लागून असलेली दमदार पावसाची प्रतिक्षा बुधवारी संपली.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या जळगावकरांना बुधवारी रात्री काहीसा दिलासा मिळाला. बुधवारी सकाळपासून जळगाव शहरासह परिसरात उन्हाने तडाखा दिला होता. दिवसभर कडक उन पडल्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून आकाशात ढगांनी गर्दी केली होती. काही वेळातच मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

तब्बल पाऊण तास पाऊस सुरू होता. या काळात शहरातील काही भागात विजपुरवठा देखील खंडीत झाला होता. दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे शहरात उंचसखल भागात पाणी साचले होते. रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत पाऊस दमदार बरसत होता. या पावसामुळे परिसातील बळीराजासह जळगावकर नागरिक कमालीचे सुखावले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com