कौशल्य विकास विभाग : आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

युझर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतरच मिळेल माहिती
कौशल्य विकास विभाग : आधार व मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील उमेदवारांची ऑनलाईन नावनोंदणी सन 2013 पासून कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करता येते, त्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी....

कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नावनोंदणी करीतच आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन नांवनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुशंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.

अद्यापही ऑनलाईन नांवनोंदणी केलेल्या ब-याचशा उमेदवारांनी त्यांचे आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद केलेला नाही. तसेच आधारक्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांकही नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होतात.

नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या ww.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अपडेट न केल्यास आपली नोंदणी 31 ऑगस्ट, 2020 अखेर रद्द होईल. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा, असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com