चाळीसगाव : कोरोना महामारीत सभा घेणे योग्य आहे काय ?

कंटेन्मेंट झोन मधील दोन नगरसेवक सभेला उपस्थित
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नगरसेवक
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नगरसेवक

चाळीसगाव - शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शहरात अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. परंतू चाळीसगाव नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधपक्षातील नगरसेवकांनी याबाबत काही एक देणे घेणे दिसत नाही, शुक्रवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन्हीकडील नगरसेवकांनी गेल्या चार माहिन्यानतंर झालेल्या सर्वसाधारण सभेवर आपेक्ष घेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा घेणे योग्य आहे का ?

आम्हाला स्वता; ची व परिवाराची काळजी असल्याचे भर सभेत सांगीतले. यावरुन शहरातील जनतेचे प्रश्न व जनतेच्या जिवांपेक्षा, स्वत:च्या जीवाची नगरसेवकांना जास्त काळजी असल्याचे दिसून आले. सभेत कोरोना महामारीवर नव्हे, तर ठेकेदारांच्या विषयांवर जास्त चर्चा करण्यात आली. त्यामुळे काही नगरसेवकवगळता कोरोनाचे किती गांर्भीय इतर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना आहे यांची जाणीव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत झाली.

चाळीसगाव नगर परिषदेची सर्वसाधरण सभा शुक्रवार (दि.3) नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे, उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातील कोरोना युध्दात शहीद झालेल्या सर्वांना श्रध्दाजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभेचे इतिवृत वाचण्यास सुरुवात झाल्यानतंर भाजपाचे नगरसेवक चंद्रकात तायडे यांनी सुरुवातीलचा सर्वसाधरण सभेच्या आयोजनावर आकक्षेप घेत, कोरोनाच्या महाभयकर परिस्थिती सभा घेणे गरजेचे होते का ? असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हाधिकार्‍यांची सभेला परवागी नसल्याचा सांगीतले आहे.

यावर शहविचे गटनेते सुरेश स्वार, अण्णा कोळी, नगरसेवक सुर्यकांत ठाकुर, रामंचद्र जाधव, दिपक पाटील, नगरसेवीका सविता राजपूत भाजपाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आदिनी समर्थन करत, सभा पुढे घेण्यात यावी अशा सूचना मांडल्यात, तसेच शासनाच्या नियामांप्रमाणे सभा घेण्यात येत नसल्याचा आरोप केला. तर रामचंद्र जाधव यांनी शहर ज्यावेळस कोरानामुक्त होते, त्यावेळेस न.पा.तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. परंतू आता शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, कुठल्याही उपाय-योजना केल्या जात नसल्याचा आरोप केला. यावर मुख्याधिकारी व नगराध्यक्षा उत्तर देत सांगीतले की, गेल्या चार महिन्यांपासून सभा झालेली नाही, शहराच्या विकासासंबंधीत दैनदिन वार्षीक विषय व इतर अनेक विषय प्रलंबीत आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी सभा घेतल्याचा खुलासा केला.

परंतू त्यानतंर एकाही नगरसेवकाने शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात काय-काय उपाय योजना केल्या पाहिजे, याबाबत सविस्तरपणे आपले म्हणने माडले नाही, किवा शहराची वाढत्या रुग्ण संख्या आटोक्यात आनण्यासाठी न.पा.तर्फे कशा पद्धतीने जनजागृती केली पाहिजे, यावर देखील सविस्तर मत मांडेल नाहीत. परंतू नगरसेवक रामचंद्र जाधव व सुर्यकांत ठाकुर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या शेवटी जनात कर्फ्यु व स्वच्छतेबाबतचा मुद्दा मांडला होता. परंतू त्यावर देखील सविस्तर चर्चा झाली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com