पर्यावरण कर थकीत वाहनांचा होणार लिलाव

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे निर्देश
पर्यावरण कर थकीत वाहनांचा होणार लिलाव
USER

जळगाव - Jalgaon

वाहन कर- पर्यावरण कर थकीत वाहनांच्या मालकांनी, ताबेदारांनी, वित्तदात्यांनी थकीत कर, पर्यावरण कर, शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन आपली वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 25 जून, 2021 पर्यंत लेखी स्वरुपात घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 जून, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात येईल असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यांस कळविणे बंधनकारक असतांना देखील वाहनांच्या मालकांनी काहीही कळविलेले नाही.

लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीसबोर्डावर चिकटविण्यात आलेली आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण 15 स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात दि.29 जून, 2021 रोजी सकाळी 12.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) हा Dy. RTO. Jalgaon (payble at SBI Main Branch, Jalgaon) या नावे अंदाजित 15 वाहनांच्या बोली रक्कमेचा सी.टी.एस मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन या कार्यालयास त्याचदिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सोबत शॉप ॲक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी जमा झालेले बंद लिफाफ्यात डिमांड ड्रॉफट खुले करण्यात येतील. ज्या व्यक्तींने सर्वाधिक किंमतीचा डिमांड ड्रॉफ्ट जमा केलेला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल.

लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे दिनांक 29 जून रोजी 4.00 वाजता होईल. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे. असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com