कारागृह महानिरीक्षक डी.के. झळके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली
कारागृह महानिरीक्षक डी.के. झळके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली
जळगाव

कारागृह महानिरीक्षक जळगावात

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या कर्मचार्‍याच्या डोक्याला गावठी कट्टा लावून तिघा कैद्यांनी कारागृहातून पलायन केल्याची सिनेस्टाईल घटना शनिवारी सकाळी 7.25 वाजता घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली

कारागृह महानिरीक्षक डी.के. झळके यांनी देखील औरंगाबाद येथून जळगाव गाठीत झाल्या प्रकाराची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत झळके हे जळगावात ठाण मांडून होते.

पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधिक्षक डॉ.निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com