ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी

ट्रामा केअरच्या प्रवेशद्वाराजवळ पुतळ्याचे लवकरच अनावरण
ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागेची पाहणी

चाळीसगाव - प्रतिनिधी chalisgaon

शहरातील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारली गेली असून या साडेपाच एकर परिसराला खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून, रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. खासदारांनी या जागेची पाहणी करून, पुतळा बसवण्यात संदर्भात पुन्हा जोरदार प्रयत्न सुरु केल्याने लवकरच हा पुतळा साकारला जाणार आहे.

चाळीसगाव येथे जळगाव जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी आरोग्य संकुल म्हणून उदयास येणार्‍या महात्मा फुले जन आरोग्य संकुलाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून आतील इलेक्ट्रिक, फर्निचर कामे प्रगतीपथावर असून लवकरच संपुष्टात येत आहे, या परिसरात सध्याच्या कोरोना महामारीच्या धर्तीवर पन्नास बेडचे अत्याधुनिक सेंटर उभारले जाणार असून २०० बेड चे क्वारंटाइन सेंटर साकारले जाणार आहे.

या इमारती मुळे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव तालुका व तालुक्यातून जाणार्‍या महामार्गावर नित्यनेमाने होणार्‍या अपघातांच्या प्रसंगी जखमींना धुळे मालेगाव जळगाव औरंगाबाद येथे हलवावे लागते अशा बिकट प्रसंगी अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर व रुग्णालय असावे या दूरदृष्टी व नियोजनातून खासदार उन्मेश पाटील यांनी या इमारतीसाठी मोठा निधी मिळवीला होता.

उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा असलेल्या इमारतीमध्ये नागरीकांच्या सर्व आरोग्य गरजा पूर्ण होणार असल्याने शहरवासीयांच्या व ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे, या आरोग्य संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या करीता चौथारा बांधण्याचे काम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या परिसराला भेट दिली.

याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील यांनी ही बाब जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर घातली होती. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातालकर यांनी जिल्हाधिकारी पुतळा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या पुतळ्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही अशी पुष्टी जोडली होती. खासदार यांच्या संकल्पनेतील हा पुतळा संकल्पना लवकरच साकारले जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी उपस्थित अधिकारी पदाधिकार्‍यांनी केले होते, त्या अनुषंगाने खासदार उन्मेश पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी समवेत चौथार्‍याची पाहणी केली, लवकरच येथे पुतळा साकारला जाणार असल्याची माहिती देखील पदाधिकार्‍यांनी दिली.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख व दहिवद उपसरपंच भीमराव नाना खलाने, माजी पंचायत समिती सदस्य जगन आप्पा महाजन,पी ओ महाजन सर, आप्पा महाजन, सचिन महाजन, पंकज पवार, लखन मोरे, माजी सरपंच रवीआबा पाटील,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, गणेश चित्ते (वाडे)यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात प्लेगच्या महामारीच्या संकटाच्या प्रसंगी या पती-पत्नीनी आपला जीव धोक्यात घालून प्लेग रुग्णांची सेवा केली होती, स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील आपली अविरत आरोग्यसेवा यांनी सुरू ठेवली होती. क्रांती ज्योती सावित्रीबाई यांचा तर १८ मार्च १८९७ साली पुण्यात प्लेग रुग्ण सेवेत मृत्यू झाला होता. या गोष्टीचे भान ठेवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा येथे साकारला जावा ही इच्छा होती आणि ती प्रत्यक्षात साकारली जाणार असल्याने मला मनस्वी आनंद आहे.

उन्मेश पाटील, खासदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com