विधिमंडळ समितीकडून जिल्ह्यातील प्रकल्पांची पाहणी

अंजनी धरण, शेळगाव बॅरेज, बोदवड उपसा सिंचनला भेट
विधिमंडळ समितीकडून जिल्ह्यातील प्रकल्पांची पाहणी

जळगाव - Jalgaon

विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीने दुसर्‍या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना भेटी देवून पाहणी केली. दरम्यान,समितीने संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील विकासकामांसह प्रलंबित विकासकामांची माहिती जाणून घेण्यासाठी विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समिती तीन दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आहे.

मंगळवारी पहिल्या दिवशी (Collector's Office) जिल्हधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेतली. दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी (Padmalaya) पद्मालयजवळील साठवण बंधारा येथे पाहणी केली. त्यानंतर एरंडोल (Erandol) तालुक्यातील (Anjani Project) अंजनी प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली.त्यानंतर दुपारी शेडगाव बॅरेज (Shedgaon Barrage),भुसावळ (Bhusawal) येथील अमृतची पाणीपुरवठा योजना आणि त्यानंतर (Bodwad Upsa Irrigation) बोदवड उपसा सिंचनला भेट देवून अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली.यावेळी समितीचे प्रमुख आमदार रणजीत कांबळे (MLA Ranjit Kamble), आ.चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil), आ.संजय गायकवाड, आ.भरत गोगावले, आ.प्रकाश सोळंखे, आ.माणिकराव कोकाटे, आ.विकास कुंभारे, आ.कृष्णा खोपडे, आ.रईस शेख, आ.विलास पोतनीस, आ.डॉ.वजाहत मिर्जा, आ.निलय नाईक, आ.बळवंत वानखेडे, आ.कपील पाटील, आ.विनायक मेटे उपस्थित होते.उद्या दि. २६ रोजी काही प्रकल्पांना भेटी देण्यात येणार असून अधिकार्‍यांची बैठक घेतली जाणार आहे.

शासनाकडे अहवाल करणार सादर
जिल्ह्यातील विकासकामांबाबत आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीकडून पाहणी करण्यात येत आहे.तसेच अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. तीन दिवसाचा दौरा आटोपल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com