जिल्ह्यातील पोल्ट्री फॉर्म्समधील पक्षांची तपासणी

‘बर्ड फलू’ संदर्भात प्रशासन अलर्ट
जिल्ह्यातील पोल्ट्री फॉर्म्समधील पक्षांची तपासणी
USER

जळगाव - Jalgaon

कोरोना साथरोग प्रादूर्भाव आटोक्यात येत असतांनाच नवीन संकट घोंगावत आहे. नवापूर, नंदूरबार जिल्हयात याचा मोठया प्रमाणावर पक्षांवर ‘बर्ड फलू’ चा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

पोल्ट्री फॉर्ममधील कोंबडयांच्या मृत्यू ‘बर्ड फलू’ चा प्रादूर्भावामुळे झाला असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात  प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून अफवांवर विश्वास ठेवू नये असा इशारा देखिल देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सूत्रांनी दिली.

खान्देशातील पश्‍चिम भागात नवापूर जिल्ह्यात पोल्ट्री फॉर्म व्यावसाययिकांवर मोठे संकट घोंगावत असून गेल्या १५-१६ वर्षापूर्वी देखिल फेब्रुवारी २००६ मधे ‘बर्ड फलू’या साथरोगाचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर झाला होता. जळगाव जिल्हयात सुमारे १२ ते १५ लाख कुक्कूट पक्षांची संख्या असून जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फॉर्म व्यावसाययिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देखिल देण्यात आले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com