जामनेरच्या त्या व्यापारी संकुलाच्या चौकशीसाठी समिती जळगावात दाखल

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाकडून घेताहेत माहिती
जामनेरच्या त्या व्यापारी संकुलाच्या चौकशीसाठी समिती जळगावात दाखल

जळगाव - Jalgaon

जामनेर येथील व्यापारी संकुलाच्या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप ऍड. विजय पाटील यांनी केला होता.

याप्रकरणाच्या समितीकडून शासनाने नियुक्ती केलेली तीन सदस्यीय समिती आज गुरुवारी जळगावात दाखल झाली आहे. समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेत ठाण मांडले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून त्या संकुलाच्या बांधकामाची माहिती घेतली जात आहे. राज्यातील अशाप्रकारे घोटाळ्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा समितीकडून केला जात आहे. या समितीत नाशिक विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मनिष सांगळे, राजन पाटील, आणि सहाय्यक लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com