दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांच्या कारभाराची चौकशी करा
दीपनगर

दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांच्या कारभाराची चौकशी करा

माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची प्रकल्प संचालक थांगपंडियन यांच्याकडे तक्रार

वरणगाव फॅक्टरी Varangaon Factory (वार्ताहर)

दीपनगर Deepnagar Power generation वीजनिर्मिती केंद्राचे मुख्यभियंता विवेक रोकडे Chief Superintendent Vivek Rokade हे पक्षपाती पणाची वागणूक देत असून विरोधी पक्षात असलेला भाजपच्या कार्यकर्त्यांना कामावरून कमी केलेले आहे. त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे Sunil Kale यांनी पत्रकार परीषदेत केली.

अनेकवेळा आंदोलने झाली मात्र काहीही उपयोग झाला नाही स्थानिक भूमीपूत्रांना रोजगार दिला पाहिजे मात्र मुख्य अभियंता रोकडे तसे न करता परप्रांतिय लोकांना प्रकल्पात 90 टक्के घेतले आहे स्थानिकांना घेतल जातं नाही. जे आहे त्यांना काढले जात असून स्थानिकांवर अन्याय केला जात आहे.

मुख्यभियंता विवेक रोकडे यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपध्यक्ष मिलिंद भैसे, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, कलाकर मराठे यांनी 660 प्रकल्पाचे संचालक थांगपंडियन यांना प्रत्यक्ष भेटून मुख्यभियंता रोकडे यांच्या समक्ष रोकडेंची तक्रार केली यावेळी स्थनिक भूमीपूत्रांच्या हाताला काम देउन रोजगार द्या तसेच भाजपाच्या लोकांना काढले त्यांना कामावर घ्या तसेच प्रकल्पात रेती बोगस वापरली जात आहे. उपमुख्यभियंता सी. के. तायडे यांनी कारण नसतांना टेंडर मर्जितल्या लोकांना देण्यासाठी काढून भ्रष्ट्राचार झाला असल्याची शंका आहे.

टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ - केंद्रात टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोळ मुख्यभियंता रोकडे, उपमुख्य अभियंता सी. के. तायडे, भेलचे गोस्वामी, एम. डी. जावळे यांची टीम एक रॅकेट आहे. वर्षानुवर्षे एका एका ठेकेदारांना वारंवार ठेके कसे भेटतात ही एक रॅकेट आहे टेंडर मॅनेज करून ठेकेदार हे गब्बर होत आहे. स्थनिक सुक्षित बेरोजगार संघटनांना आहे त्यांना कंत्राट मिळत नाही या सर्व प्रकरणाला मुख्यभियंता रोकडे, श्री. तायडे, भेलचे गोस्वामी व जावळे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करून बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com