रेल्वे रुळावरील जखमीला दिले जीवदान

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु; ओळख पटविण्याचे आव्हान
रेल्वे रुळावरील जखमीला दिले जीवदान

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर एक जखमी तरुण विव्हळत पडला होता.

यावेळी याठिकाणाहून जात असलेल्या पत्रकाराने प्रसंगावधन राखीत ट्रॅकमन व नारिकांच्या मदतीने त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीशेजारी तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडला असल्याचे याठिकाणाहून जात असलेले पत्रकार जकी अहमद यांना दिसले.

त्यांनी अनेक नागरिकांना मदतीसाठी विनवनी केली परंतु मदत करण्यास कोणीही तयार करीत नव्हते. यावेळी त्यांनी लोहमार्ग पोलीस निरीक्षक सी. एस. पटेल यांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान सैय्यद रेहान आणि परिसरातील ओळखीच्या नागरिकांना बोलावून व ट्रॅकमन समशेर अली, नवाज अली, अरबाज खान, शोएब अली, जुबेर शेख यांच्या मदतीने रिक्षाचालक तुषार ठाकरे याच्या रिक्षेत जकी अहमद यांनी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डोक्याला मार लागल्याने प्रकृती गंभीर जखमीसउपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता. याठिकाणी

डॉ. दीपक जाधव, डॉ. उमेश जाधव आणि परिचारिका व कर्मचार्‍यांनी तात्काळ त्याला ऑक्सिजन लावून उपचार सुरु केले. त्याच्या डोक्याला, चेहर्‍याला आणि पायाला मार लागला असून त्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अद्याप पटली नाही जखमीची ओळख

जखमी तरुणाची संध्याकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील महाले यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com