जळगाव : सातपुड्यातील सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव
जळगाव

जळगाव : सातपुड्यातील सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव

निसर्ग प्रेमींनी व्यक्त केली चिंता

Rajendra Patil

दिलीप पालीवाल

लासुर ता.चोपडा - Chopada - Lasur

गावालगत असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत विविध जातीचे वृक्ष लागवड केली आहे. परंतु सागवान हे वृक्ष सोनं म्हणून ओळखले जाते. कारण या जातीच्या वृक्षांचे लाकूड हे टिकाऊ असल्या कारणाने त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते परंतू सध्या पावसाचे दिवस असल्याने सातपुडा पर्वताने जणू नेसलायं हिरवा शालू म्हणून या सातपुडा पर्वतांमध्ये संध्याकाळी निसर्ग प्रेमींची संख्या हि लक्षणीय असते.

जंगलात संध्याकाळी विविध प्रकारचे पक्षांचे किलकिलाटाच्या आवाजाने माणसाचे मन तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. परंतू खरे निसर्गाचे ऱ्हास होत असल्याने वनक्षेत्रात विविध प्रजातीच्या अळ्यांनी सागवान जातीच्या वृक्षांचे पाने पुर्णपणे चाळणी करून टाकल्याने हे सागवान जातीचे वृक्ष ओळखीचे सुध्दा लागत नाही.

यामुळे निसर्ग प्रेमींनी सुध्दा चिंता व्यक्त केली आहे. जर या अळ्यांनी आपला मार्गक्रम सुरू ठेवली तर भविष्यात सागवान जातीच्या वृक्षांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही पर्यायाने निसर्गाचे सौंदर्यावर देखील परिणाम कमी होईल.

रासायनिक फवारणीमुळे पक्षांची संख्या झाली कमी

अन्नसाखळीनुसार पक्षी अळी कीटक खाऊन आपले जीवनचक्र चालवतात पण वाढत्या रासायनिक फवारणी तसेच प्रदूषणामुळे पक्षी नाहीसे होऊन नुकसानकारक अळ्यांचा प्रादुर्भाव सातपुडा पर्वतावरील झाडांवर दिसत आहे. अजुनही जर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला नाही तर पिकांवर देखील या अळ्यांचा प्रकोप होईल.

-विश्राम तेले, तालुका संपर्क प्रमुख निसर्ग मित्र समिती चोपडा

Deshdoot
www.deshdoot.com