राज्य नाट्यात इंदूरचे ‘मार्फोसिस’ तृतीय
जळगाव

राज्य नाट्यात इंदूरचे ‘मार्फोसिस’ तृतीय

Balvant Gaikwad

जळगाव  –

59व्या राज्य नाट्य स्पर्धेत जळगाव विभागातून अंतिम फेरीत मजल मारलेल्या नाट्यभारती, इंदूरच्या मार्फोसिस नाटकाने घवघवीत यश प्राप्त केले तर जळगावच्या मू.जे.महाविद्यालयाच्या डॉ.श्रद्धा पाटील यांना इस्टमन कलर या नाटकासाठी अभिनयाचे रौप्यपदक मिळालेे. स्पर्धेचा निकाल 5 मार्च रोजी घोषित करण्यात आला.

जळगावात राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली होती. या फेरीत एकूण 21 नाटकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यात इंदूर येथील ‘मार्फोसिस’ नाटकाला प्रथम तर मू.जे.महाविद्यालयाचे ‘इस्टमन कलर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळून दोघा नाटकांची औरंगाबाद येथे होणार्‍या अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.

यावेळी औरंगाबादमध्ये दोन्ही नाटकांचे सादरीकरण झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 46 संघांची निवड या अंतिम फेरीसाठी झाली होती. यातून जळगाव विभागातील नाट्यभारती इंदूर येथील मार्फोसिस नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून जळगाव विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

‘मार्फोसिस’ हे नाटक एक अभिनेता व एका दिग्दर्शकाची कहाणी असून या दोघांनीही साकारलेल्या ‘मानस’ या पात्राची आहे. ‘मार्फोसिस’ हे नाटक म्हणजे एका सर्वांग सुंदर कलाकृतीबरोबरच एक सुंदर अनुभूतीदेखील प्रेक्षकांनी अनुभवली होती.

Deshdoot
www.deshdoot.com